महाराष्ट्र : अखेर 2013 पासून सुरू असणाऱ्या लढाईला (Marathi) आज यश आले आहे. 2 हजार वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या मराठी माय मराठी भाषेला अखेर अभिजात दर्जा देण्याचा निर्णय केंद्रात घेण्यात आला आहे. यामुळे 13 कोटी मराठीजनांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
Navratri Day 1 – नर्मदालयाच्या शिक्षणव्रती – भारती ठाकूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी समाजाला अभिनंदन देत म्हंटले आहे, की (Marathi) मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल.