नवी दिल्ली : परदेशात शिकणाऱ्या (MEA) भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) मते, गेल्या पाच वर्षांत 41 देशांमध्ये किमान 633 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. कॅनडामध्ये सर्वाधिक 172 मृत्यू झाले आहेत. हिंसक हल्ल्यात 19 विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मृत्यूच्या कारणांमध्ये नैसर्गिक कारणे, अपघात आणि वैद्यकीय आणीबाणीचाही समावेश होतो. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात केरळचे खासदार कोडीकुन्नील सुरेश यांनी विचारलेल्या प्रश्नावर परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी ही माहिती दिली.
Paris Olympics 2024 : कृष्णनितीने मनू भाकरने जिंकले ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक
कॅनडामध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला (MEA)
परराष्ट्रमंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितले की कॅनडामध्ये सर्वाधिक 172 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर अमेरिकेत 108 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ब्रिटनमध्ये 58, ऑस्ट्रेलियामध्ये 57, रशियामध्ये 37 आणि जर्मनीमध्ये 24 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
शेजारी देश पाकिस्तानमधील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचीही (MEA) बातमी आहे. मात्र, परदेशात भारतीय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हिंसक हल्ल्यांबाबत विचारलेल्या अन्य एका प्रश्नावर केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, भारतीय मिशन/पोस्टकडे उपलब्ध डेटावरून, अलीकडे परदेशात गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवरील हिंसाचारात कोणतीही वाढ झालेली नाही.