अकोले : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर (MNS) टीका केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला. यामध्ये कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोफ केली. या प्रकरणी पोलिसांनी 13 जणांना अटक केली. परंतु, या प्रकरणात एका कार्यकर्त्यांचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे आता अधिकच खळबळ उडाली. जाणून घेऊया हे प्रकरण नेमके काय आहे?
राज ठाकरे यांची टीका
गेल्या आठवड्यात पुणे येथे मुसळधार पावसाने पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यावर मनसे नेते राज ठाकरे यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी राज ठाकरे यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात नसताना पुण्याच्या धरणातून पाणी वाहिले अशी जोरदार टीका केली.
Dharavi : निर्घृण हत्या झालेल्या तरुणाच्या अंत्ययात्रेवर दगडफेक; अरविंदच्या कुटुंबियांची मोठी मागणी
अमोल मिटकरी याचे प्रतिउत्तर
या टिकेला प्रतिउत्तर देताना राष्ट्रवादी गटाचे अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाण साधत म्हंटले, की ”सुपारी बहाद्दरांनी दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित दादांवर बोलू नये. कारण टोल नाका, भोंगे, किंवा अन्य कोणतेही आंदोलन या सुपारी बहाद्दरांचे यशस्वी झालेले नाही. या व्यक्तीची विश्वासार्हता संपलेली आहे. राज्याच्या इतिहासात सर्वाधिक अपयशी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे म्हणजे सूर्याला वाकुल्या दाखवण्याचा (MNS) प्रकार आहे.”
हल्ल्यामागे मास्टरमाइंड राज ठाकरे आरोप?
हे प्रकरण इथेच थांबले नाहीत, तर अमोल मिटकरी यांच्या या वक्तव्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी अकोले येथे अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली. या प्रकरणी माझ्यावरील हल्ल्याचे मुख्य मास्टरमाईंड हे राज ठाकरेच असल्याचा मोठा आरोप अमोल मिटकरी यांनी केला.
13 जणांवर गुन्हा दाखल
यानंतर मिटकरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपींमध्ये मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे, जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, राजेश काळे, सौरभ भगत, महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे, बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष सचिन गालट यांच्यासह 13 जणांवर गुन्हा दाखल केला. तर तीन जणांना अटकही केली.
कार्यकर्त्याचा मृत्यू
या तोंडफोडीच्या प्रकरणात जय मालोकार हा कार्यकर्ता ही (MNS) समाविष्ट होता. या गोंधळानंतर त्याच्या छातीत दुखू लागले. त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला तातडीने अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याला पुन्हा तीव्रहृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला.
जय मालोकार या मनसे कार्यकर्त्यावर आज दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार होणार असून प्रदेश सरचिटणीस राजू उंबरकर आणि प्रदेश उपाध्यक्ष तसेच अकोला संपर्कप्रमुख विठ्ठल लोखंडकार उपस्थित राहणार आहेत. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे त्याच्या घरी भेट देणार आहेत.