मुंबई : अंधेरी पश्चिम येथील गावदेवी माता दहीकाला पथकाने (Mumbai) गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी अंधेरीकरांना आठ थरांच्या मानवी मनोऱ्याचे दर्शन दिले. आठ थरांचा थरार दाखवणारे अंधेरीतील हे पहिले गोविंदा पथक आहे. ज्यांनी सलग 2023 आणि 2024 अशी दोन वर्ष अंधेरी नागरित आठ थर लावले.
दिवंगत जयवंत परब प्रतिष्ठानतर्फे डि एन नगर मानाची दहीहंडी 2024 येथे प्रशिक्षक प्रसाद अशोक तळेकर यांच्या प्रशिक्षणाखाली सलग दोन वर्ष तरुण दहीहंडीचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्याच प्रयत्नाने तरुणांना 8 थर रचण्यात यश मिळाले आहे.
या पथकाची स्थापना 2010 साली झाली होती. गेले 14 वर्ष हे पथक सराव (Mumbai) आहेत. त्यांनी 2019 साली पहिला प्रयत्न केला, त्यानंतर 2022 साली 2 वेळा प्रयत्न केला. आणि 2023 साली ते यशस्वी ठरले.
Mumbai Local : प्रवाशांनो सावधान! मुंबईत 35 दिवसांचा मेगाब्लॉक