मुंबई : वाढदिवसाच्या दिवशी तिघांनी स्पामध्ये काम करणाऱ्या (Mumbai Spa Murder) 50 वर्षीय व्यक्तीची केली. या हत्येमागील आरोपीची नावे पोलिसांना खून झालेल्या तरुणाच्या मांडीवर असलेल्या टॅटूमध्ये आढळली. आमीर खानचा गजनी चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल. हीरो त्याच्या शत्रूंपासून बदला घेण्यासाठी, त्याच्या शरीरावर त्यांची नावे गोंदवून घेतो. आणि त्यांच्याकडून एक एक करून बदला घेतो. असेच काहीसे या घटनेत घडले आहे. आहे की नाही आश्चर्य? तर जाणून घेऊया सविस्तर घटना.
गुरू सिद्धप्पा वाघमारे (वय 50) याचा 21 जुलै रोजी वरळी येथे तो काम करत असलेल्या सॉफ्ट टच स्पा येथे खून होतो. त्याच्या मृत्यूनंतर पोलिसांना त्याच्या मांडीवर 20 ते 22 नावांचे टॅटू सापडले आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईला लागून असलेल्या नालासोपारा आणि कोटा येथून चार जणांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी एकूण दोन जणांना अटक करण्यात आली. दोघांची चौकशी अद्याप सुरू आहे. याप्रकरणी स्पा मालकालाही अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गुरु सिद्धप्पा वाघमारे हा मुंबईतील विलेपार्ले भागातील रहिवासी आहे. वाघमारे मंगळवारी सायंकाळी स्पामध्ये गेला होता. 23 जुलै रोजी त्याची 21 वर्षांची मैत्रीण आणि तीन पुरुष मित्रही तिथे होते. वाघमारे याचा 17 जुलै रोजी वाढदिवस असल्याने सर्वांनी मिळून त्याला वाढदिवसाची पार्टी देण्यास सांगितले. त्यांनी पार्टी केली. वाघमारे व त्याची मैत्रीण तेथेच थांबले. आणि त्यांचे मित्र निघून गेले.
एका हॉटेलमध्ये थांबलेले पाच लोक रात्री 12.30 च्या सुमारास स्पामध्ये परतले. काही वेळाने तीन जण निघून गेले. सुमारे दोन तासांनंतर दोन वेगवेगळे लोक स्पामध्ये आले आणि त्यांनी वाघमारे याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला.
Maharashtra Assembly : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री चेहरा ‘एकनाथ शिंदे’? जाणून घ्या सविस्तर
सुपारी मारणाऱ्यांची ओळख:
मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद फिरोज अन्सारी असून तो (Mumbai Spa Murder) 26 वर्षांचा आहे. त्याला नालासोपारा येथून अटक करण्यात आली आहे. दुसरा आरोपी साकिब अन्सारी याला कोटा येथून पकडण्यात आले आहे. वरळी पोलीस आता इतर संशयितांचीही चौकशी करत आहेत.
या दोघांचे कनेक्शन स्पा मालकाशी असल्याचे बोलले जात आहे. गुरू सिद्धप्पा वाघमारे याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह पाहिला असता त्याच्या दोन्ही मांड्यांवर 20-22 जणांची नावे लिहिली होती. आता पोलीस त्या लोकांची चौकशी करत आहेत. याच यादीत असलेल्या एका नावावरून पोलिसांना या प्रकरणात आरोपींची माहिती मिळाली. त्यानंतरच पोलिसांनी आरोपीला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी वरळी पोलिसांनी स्पा मालक (Mumbai Spa Murder) संतोष शेरेकर याला अटक केली आहे. गुरू सिद्धप्पा वाघमारे याच्या हत्येसाठी आरोपी संतोष शेरेकर याने मारेकऱ्यांना सहा लाख रुपये दिल्याचे पोलिसांनी सांगितले.