मुंबई : सध्या मराठी बिग बॉसमध्ये एक नाव गाजत (Nikki Tamboli) आहे. ते म्हणजे निक्की तांबोळी. आपल्या उद्धट वागण्याने तिने मराठी प्रेक्षकांना नाराज केले. यामुळे या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अभिनेता रितेश देशमुख याने तीला महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागायला लावली. पण याच दरम्यान तिच्या जुन्या काही गोष्टींवरून देखील ती सध्या ट्रोल होत आहे. ‘आम्ही आहोत खूप चालू माल’ म्हणणाऱ्या निकिता तांबोळीचे अवैध सावकारी म्हणजेच मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखर सोबत संबंध होते, तर ज्यावेळी त्याला इडिने अटक केली त्यावेळी ती देखील त्याला कारागृहात भेटायला जात होती असे समोर आले आहे. याबाबत थेट इडिने देखील खुलासा केला आहे.
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हीचा प्रियकर सुकेश चंद्रशेखर याला इडिने अटक केली. यावेळी त्याला नोरा फतेहसह आणखी काही अभिनेत्री जेलमध्ये भेटायला जात असत. यामध्ये ‘बिग बॉस’ फेम निकिता तांबोळी देखील होती. यावर तिने खुलासा केला होता, की पिंकी इराणीने तिला सुकेश चंद्रशेखरचे नाव ‘शेखर’ असल्याचे सांगितले होते. निकिताने असेही सांगितले की पिंकी इराणीने सुकेशची ओळख दक्षिण भारतीय चित्रपट निर्माता म्हणून करून दिली होती.
Senate Elections : आगामी सिनेट निवडणुकीत भाजप शिंदे गटाविरुद्ध लढणार?
ईडीने आपल्या आरोपपत्रात खुलासा केला आहे की, निकिता तांबोळी (Nikki Tamboli) यांनी आरोपी सुकेश चंद्रशेखरची तिहार तुरुंगात दोनदा भेट घेतली आहे. निक्की आणि सुकेश याची भेट एप्रिल 2018 मध्ये झाली. या भेटीसाठी सुकेश चंद्रशेखर याने पिंकी इराणीला 10 लाख रुपये दिले होते. त्यापैकी पिंकी इराणीने दीड लाख रुपयांची रोख रक्कम निकिता तांबोळीला दिली. दोन तीन आठवड्यांनी निकिता आणि सुकेश यांची वैयक्तिक भेट झाली यामध्ये त्याने निकिताला दोन लाख रुपये रोख आणि गुच्ची बॅग दिली होती.