Palghar : महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याचे प्रकरण (Palghar) अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. राज्य सरकारपासून ते केंद्र सरकारपर्यंत या विषयावर सातत्याने चर्चा होत आहे. शुक्रवारी जेव्हा पीएम मोदी महाराष्ट्रातील पालघर येथे पोहोचले तेव्हा त्यांनी भाषणादरम्यान या घटनेचा उल्लेख केला आणि मंचावर हात जोडून डोके टेकवत माफी मागितली. ते म्हणाले, ‘शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याबद्दल मी माफी मागतो.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी पालघरमधील एका कार्यक्रमात सहभाग घेतला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी त्यांचा सत्कार केला. पंतप्रधान मोदींनी येथे 76,000 कोटी रुपयांच्या वाधवन बंदराची पायाभरणी केली. सुमारे 1,560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्यपालन प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही त्यांनी केली. याआधी त्यांनी मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 ला देखील संबोधित केले होते. दरम्यान, आपल्या भाषणादरम्यान त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याबद्दल दु:ख व्यक्त करत, ‘शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या कोसळण्याबद्दल मी माथा टेकून माफी मागतो,’ असे सांगितले.
Sindhudurg : ‘याचसाठी का केला होता अट्टहास हिंदवी स्वराज्याचा?’
‘फक्त पंतप्रधान मोदीच उद्घाटन करतील’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की ‘आज मी वाधवान बंदराच्या पायाभरणी (Palghar) समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपस्थित सर्व लोकांचे स्वागत करतो. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा सुवर्ण दिवस आहे. हा गेम चेंजर प्रकल्प आहे. त्याचा मुख्य फायदा पालघरच्या जनतेला होणार आहे. 2029 पर्यंत बंदराचा पहिला टप्पा सुरू होईल. पीएम मोदींच्या हस्ते पायाभरणी होत आहे आणि मी तुम्हाला सांगतो की उद्घाटनही पीएम मोदीच करणार आहेत. वाधवन हे देशातील सर्वात मोठे बंदर असेल आणि संपूर्ण जगातील पहिल्या दहा बंदरांच्या यादीत भारताचा समावेश होईल. संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.