परभणी : परभणीचे अजित दादा पवार यांच्या (Parbhani) गटातले आणि अत्यंत जवळचे संबंध असलेले बाबाजानी दुर्रानी यांच्या पुत्राने मोठे वक्तव्य केले आहे. जर पक्षाने उमेदवारी दिली; तर स्वगृही परतू असे त्याने म्हंटले आहे. काल 25 जुलै रोजी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन चर्चा केल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर आज पडसाद उमटत असल्याचे म्हंटले जात आहे. एक एक आमदार उघडपणे असे वक्तव्य करत असल्याने अजित दादांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
बाबाजानी दुर्रानी यांचा मुलगा जुनेद दुर्रानी याने म्हंटले आहे, की पक्षाने उमेदवारी दिली तर आम्ही स्वगृही परतू, अन्यथा अपक्ष उमेदवारी लढू. पण महायुतीतून निवडणूक लढवणार नाही. या वक्तव्याने दुर्रानी पिता-पुत्र अजित पवार यांच्यावर नाराज असल्याची चिन्हे दिसत आहेत; तर शरद पवार यांच्याकडून त्यांना अपेक्षा देखील आहेत.
तर, काल 25 जुलै रोजी जयंत पाटील यांनी परभणी येथे बाबाजानी दुर्रानी यांच्या घरी भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांच्यात बंद दाराआड चर्चा देखील झाली. 1985 सालापासून बाबाजानी दुर्रानी हे शरद पवार यांच्या सोबत होते. परंतु, त्यांनी अजित पवार गटाचा मार्ग स्वीकारला.
एकीकडे अनिल देशमुख यांनी म्हंटले होते, की पक्ष सोडून (Parbhani) गेलेल्यांना शरद पवार पक्षात जागा देणार नाहीत. परंतु, जयंत पाटील यांच्या आणि अजित पवार गटाच्या नेत्यांच्या एकमेकांना वाढलेल्या भेटीगाठी पाहता शरद पवार त्यांना आपल्या पक्षात घेणार का? हे पाहणे औत्सुकतेचे ठरले आहे.