Paris Olympic : पॅरिसमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत काल रात्री विनेश फोगट अंतिम फेरीत पोहचली आणि भारताच्या सुवर्ण पदकासाठीच्या आशा उंचावल्या. परंतु, एका आनंददायी रात्री नंतरची सकाळ भारतासाठी धक्कादायक होती. कारण अंतिम स्पर्धेत पोहचलेल्या विनेश हिला वजनाच्या कारणावरून अपात्रता ठरवण्यात आले आहे. यामुळे भारतीयांना दु:ख झाले आहे. परंतु, या परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनेश फोगटला मोलाचा संदेश दिला आहे.
पंतप्रधान म्हणाले, की विनेश, चॅम्पियन्समध्ये तू चॅम्पियन आहेस! तू भारताचा अभिमान आहात आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहात. आजचा धक्का दुखद आहे. माझी इच्छा आहे, की मी अनुभवत असलेल्या निराशेची भावना शब्दांनी व्यक्त करावी लागत आहे.
मला माहित आहे की आव्हाने स्वीकारणे हा तुझा नेहमीच (Paris Olympic) स्वभाव राहिला आहे. धैर्याने परत या! आम्ही सर्व तुझ्यासाठी प्रार्थना करत आहोत.
पीएम मोदींनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी बोलून या विषयावर आणि विनेशच्या पराभवानंतर भारताकडे कोणते पर्याय आहेत याची प्रथम माहिती घेतली. त्यांनी विनेशच्या प्रकरणात मदतीसाठी सर्व पर्यायांचा विचार करण्यास सांगितले. विनेशला मदत करण्याच्या तिच्या अपात्रतेबद्दल त्यांनी पीटी उषा यांना तीव्र निषेध नोंदवण्याची विनंती केली.