नवी दिल्ली: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील भारतीय महिला (Paris Olympic) कुस्तीपटू अंतिम पांघल बाबत एक निराशाजनक बातमी समोर येत आहे. आपल्या बहिणीला तिचे ओळखपत्र वापरून गेम्स व्हिलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याने भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) तिच्यावर तीन वर्षांची बंदी घातली.
भारतीय ऑलिम्पिक दलाला लाजवेल असे कृत्य केल्याने कुस्तीपटू अंतिम पांघल हिच्यावर तीन वर्षांची बंदी घातली आहे. एका सूत्राने गुरुवारी ही माहिती दिली. बुधवारी महिला कुस्तीच्या 53 किलो वजनी गटातील पहिला सामना हरल्याने ती ऑलिम्पिकमधून बाहेर पडली होती.
Bangladesh Violence : बांगलादेशातील जनता भारतावर नाराज; सत्तास्थापने आधी मुहम्मद युनूस यांचे वक्तव्य
तिने अनधिकृतपणे तिच्या बहिणीला ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये येण्यासाठी ऍक्रिडिशन (Paris Olympic) कार्ड दिले होते. यामुळे ऍक्रिडिशन कार्डचा चुकीचा उपयोग करण्यात आला. ऍक्रिडिशन कार्ड घेऊन ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये घुसणाऱ्या अंतिमच्या बहिणीला फ्रेंच पोलिसांनी पकडले. यावेळी चौकशी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. भारतीय ऑलिम्पिक संघटना (IOA) येत्या 1-2 दिवसांत अंतिम सामन्याबाबत काही निर्णय घेऊ शकते.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गेल्या बुधवारी पंघालने महिलांच्या 53 किलो वजनी फ्रीस्टाइलच्या पहिल्या फेरीत भाग घेतला होता. या सामन्यातील अंतिम सामना तुर्कियेच्या येनेप येतगिलशी झाला. या सामन्यात येनेपने उत्तरार्धात 10-0 असा पराभव केला होता.