Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून एक धक्कादायक (Paris Olympics 2024) बातमी समोर आली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक वादग्रस्त सामना पाहायला मिळाला. इटालियन बॉक्सर अँजेला कॅरिनीने तिची अल्जेरियन प्रतिस्पर्धी इमान खलिफसमोर अवघ्या 46 सेकंदांनंतर सामना सोडला. सामन्यानंतर कॅरिनीने खुलासा केला की त्याला खलीफने तिला खूप जास्त जोरात फटका मारला. ज्यामुळे तिला सामना सोडावा लागला. इमान खलिफ हा ट्रान्सजेंडर आहे आणि त्याला महिलांच्या गटात खेळवणे हे चुकीचे आहे असे अँजेला कॅरिनी म्हणाली. तिच्या या वक्तव्याचे जगभरात तसेच देशभरात समर्थन केले जात आहे. ऑलिम्पिकमध्ये हा भेदभाव केला जात असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षीच्या म्हणजेच 2023 च्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि लिंग चाचणीत अपयशी झाल्याने इमान खलिफ याला ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. परंतु, त्याला यंदा महिलांच्या गटात समाविष्ट केले आहे.
फटका बसल्यानंतर कॅरिनीने सामना सोडला आणि ती रडू लागली. खलिफाने तिच्या हनुवटीवर जोरदार प्रहार केल्याने तिला रक्तस्त्राव झाला. पहिल्याच पंचामध्ये तिने चिनस्ट्रॅप काढला.
कॅरिनी म्हणाली, “माझ्या मनाला दु:ख झाले आहे. मी माझ्या वडिलांचा सन्मान करण्यासाठी रिंगमध्ये गेले होते. मला अनेकदा सांगण्यात आले आहे, की मी एक सेनानी आहे, पण मी माझ्या तब्येतीसाठी थांबणे पसंत केले. मला असा ठोसा कधीच जाणवला नाही.
Mumbai : सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ
कॅरिनी पुढे म्हणाली, ‘अनेक वर्षांचा अनुभव असूनही दुसऱ्या पंचानंतर मला नाकात तीव्र वेदना (Paris Olympics 2024) जाणवत होत्या. म्हणूनच ठोसा मारल्यानंतर मी लढत पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे मी थांबले. मी नेहमीच आदराने वागण्याचा प्रयत्न केला आहे, मी नेहमीच माझ्या देशाचे निष्ठेने प्रतिनिधित्व केले आहे. यावेळी मी ते करू शकले नाही कारण मी आणखी लढू शकत नाही. माझ्या समोर जी व्यक्ती होती तीला याच्याशी काही घेणे देणे नाही. मी त्या व्यक्ती सोबत लढू शकते जे माझ्या ताकदीचे आहे; आणि जो लढण्यासाठी आला आहे.
नेटकऱ्यांचे म्हणणे आहे, की कॅरिनीसोबत अन्याय झाला आहे. तिच्या समोर महिला खेळाडू पाहिजे. जर इमान हा जिंकला आहे तर पुढच्या फेरीत त्याच्या समोर देखील महिलाच येईल आणि तीही अशा प्रकारे जखमी होऊ शकते. इमान याला ट्रान्सजेंडरच्याच गटात खेळवले जावे अशी मागणी नेटकरी करत आहेत.