Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकच्या दुसऱ्याच दिवशी 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात (Paris Olympics 2024) मनू भाकर हिने कांस्यपदक मिळवले आहे. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक मनू हिने जिंकले आहे. कोरियाच्या ओह ये जिओनने 243.2 गुणांसह सुवर्णपदक पटकावले तर कोरियाच्या किम येजीने रौप्यपदक पटकावले. कांस्यपदक मिळवल्यानंतर मनू हिने सांगितले, की कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितले होते; हाच विचार डोक्यात ठेवून मी कांस्यपदक जिंकले. तिच्या या यशाने देशभरात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भगवद्गीता वाचल्याने तिला दबावाच्या परिस्थितीत शांत राहण्यास मदत झाली आहे…श्रीकृष्णानी अर्जुनाला कर्मावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते.. एवढंच माझ्या डोक्यात चालू होत..
भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज ठरली आहे. मनू हिने जिंकल्यावर प्रतिक्रिया दिली आहे, की या खेळानंतर माझा देवांवरील विश्वास दृढ झाला आहे. पदक जिंकल्यानंतर मनू भाकरने श्रीमद भगवद् गीतेबाबत वक्तव्य केले आहे. ती भगवान श्री कृष्णाची निस्सीम भक्त आहे. ती रोज गीता वाचते. तिने सांगितले, की मी फक्त भगवद्गीतेचा विचार करत होतो” सामन्यापूर्वी मी भगवद्गीता वाचली” ती भविष्यावर विश्वास ठेवत नाही; तर तिचा कर्मावर विश्वास आहे. आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असो वा जिंकण्याचा मार्ग सगळं काही गीतेमध्येच आहे
मनू भाकरने 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. 2018 च्या युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून (Paris Olympics 2024) तिने इतिहास रचला होता.