Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरे पदक मिळाले आहे. नेमबाजीत मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग या जोडीने दक्षिण कोरियाच्या ली वोंहो आणि ओह ये जिन यांचा 16-10 असा पराभव करून कांस्य पदक पटकावले आहे. यासह ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही भारताची पहिली नेमबाज ठरली आहे.
स्वतंत्र भारतात, मनूपूर्वी, एकाही भारतीयाने ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली नव्हती. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातही तिने कांस्यपदक जिंकले. 22 वर्षीय सरबजोतचे हे पहिले ऑलिम्पिक पदक आहे.
Dharavi : भररस्त्यात पोलिसांसमोरच ‘हिंदू’ तरुणाची हात कापून निर्घृण हत्या
दोन कांस्यपदकांनी मनू भाकेरला विशेष यादीत टाकले आहे. पॅरिस (Paris Olympics 2024) ऑलिम्पिक 2024 मधील प्रतिभावान भारतीय नेमबाजाची कामगिरी अजून संपलेली नाही. मनू 2 ऑगस्ट रोजी 25 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक स्पर्धेच्या पात्रता स्पर्धेत भाग घेणार असून तीन ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू बनू शकणार आहे.