मुंबई : नेटफ्लिक्सवर 2021 मध्ये ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. रहस्यमयी (Phir Ayi Hasseen Dillruba) हा चित्रपट लोकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला होता. आता पुन्हा एकदा हसीन दिलरुबा पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी प्रेमाचा खेळ जरा जास्तच गुंतागुंतीचा होणार आहे. ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
तापसी पन्नू आणि विक्रांत मॅसी स्टारर चित्रपट ‘हसीन दिलरुबा’ मध्ये अभिनेत्री के राणी तिचा पती ऋषभ सक्सेना उर्फ रिशू (विक्रांत मॅसी) आणि तिचा चुलत भाऊ नील (हर्षवर्धन राणे) यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये दिसली होती. बायकोचे अफेअर पाहून साधा ऋषभ रागावतो आणि त्यानंतर जे घडलं ते कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल. ऋषू आणि राणीने मिळून कट रचला आणि नीलला त्यांच्या मार्गावरून दूर केले. पण यासाठी ऋषभला त्याचा हात गमवावा लागला.
पुण्यात पावसाचा हाहाकार..’ही’ ठिकाणे पाण्याखाली
आता ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ची कथा तिथून सुरू होईल जिथे आधीचा चित्रपट संपला होता. इन्स्पेक्टर किशोर राणीची चौकशी करत असताना चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. राणीचा पती ऋषभ कुठे आहे, याची चौकशी केली जात आहे. बरेच दिवस गेल्यानंतर राणी आणि ऋषभ गुप्तपणे भेटत असतात. राणी (Phir Ayi Hasseen Dillruba)अजूनही तिच्या पुस्तकातून नातेसंबंधांचे धडे शिकत असताना, ऋषभला पुन्हा भीती वाटते की त्यांच्यामध्ये तिसरी व्यक्ती येऊ शकते.
यानंतर दोघांमध्ये आलेला तिसरा व्यक्ती अभिमन्यू (सनी कौशल) दाखवला आहे. अभिमन्यू चांगला माणूस आहे, पण राणी ‘खट्याळ’ आहे. आता जर राणी पुन्हा प्रेमात पडली तर काहीतरी वाईट घडणे निश्चितच आहे. राणी, ऋषू आणि अभिमन्यूच्या या कथेत सस्पेन्ससोबतच प्रेम आणि रागहही आहे. इथे राणी त्या दोघांना ‘त्यांच्या वागण्या-बोलण्यावरून नव्हे तर त्यांच्या स्थितीवरून’ प्राथमिकता देण्याचा प्रयत्न करत आहे.