पुणे : बोपखेल येथे शाळेच्या आवारात एका अपंग अल्पवयीन मुलीवर तिचे (Pune Crime) अश्लील व्हिडिओ दाखवून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शाळेतील शिपायाला अटक करण्यात आली आहे. नारायण कुमाजी ठुबल (वय 50, रा. गणेश नगर, बोपखेल) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
38 वर्षीय शिक्षकाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. संशयित ठुबल हा तीस वर्षांपासून एका शाळेत सुरक्षा रक्षक व शिपाई म्हणून काम करत आहे. 16 जुलैला सकाळी ठुबल याने तरुणीला एक अश्लील व्हिडिओ दाखवला. तो तिला लेडीज वॉशरूममध्ये घेऊन गेला आणि त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दोघांमध्ये घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, या घटनेची शाळेत इतरांमध्ये चर्चा झाली आणि शिक्षकाने वैयक्तिकरित्या (Pune Crime) घटनेचा शोध घेतला आणि शाळेच्या पर्यवेक्षकांना याची माहिती दिली. पोलीस सतर्क झाले असून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी ठुबल याला विशेष न्यायाधीश आर.आर.मेंढे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील संतोषकुमार पटले यांनी केला आहे.
Budget 2024 Live : 5 कोटी आदिवासींना होणार फायदा; तर बजेटमध्ये काय काय झाले स्वस्त? जाणून घ्या