पुणे : सध्या देशभर आपण (Pune) महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना ऐकत आहोत. त्यामुळे या विषयावर समाज जागृती करण्यासाठी विठ्ठलवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकनृत्याच्या माध्यमातून प्रयत्न केला. माळवाडी (पडवी) येथे गोपाळकाला निमित्त विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पंचक्रोशील विठ्ठलवाडीत माळवाडी, बारवकरवाडी, दुर्गुडे बारवकरवस्ती जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले नृत्य सादर केले.
यामध्ये विठ्ठलवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी राधा कृष्णाचे नृत्य सादर केले. या गीताच्या निमित्ताने या शाळेने स्त्री सक्षमीकरण, साक्षरता अभियान जागृती केली. नृत्याचे नृत्यदिग्दर्शन युवराज घोगरे यांनी केले. मुख्याध्यापक दत्तात्रय दिवेकर यांनी (Pune) मार्गदर्शन केले. या नृत्यात शरण्या बारवकर, तन्वी बारवकर, अनुश्री भोसले, नंदिनी धायगुडे, अनन्या बारवकर, श्रावणी गडधे, विभावरी गडधे, अनुष्का बारवकर, आदिती बारवकर, कृतज्ञा अडसूळ, श्रृती बारवकर या विद्यार्थ्यिनींनी भाग घेतला.
Palghar : सिंधुदुर्ग शिवरायांच्या पुतळ्या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी मागितली माफी