नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाने बलात्काराच्या एका (Rape Case) प्रकरणात पीडितेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निकाल दिला असून आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. पहिल्याच भेटीत कोणतीही समजूतदार मुलगी बंदिस्त खोलीत डेटवर जात नाही असे फटकारत नागपूर खंडपीठाने बारावीच्या विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप असणाऱ्या तरुणाची निर्दोष मुक्तता केली.
या विषयी उच्च न्यायालयाने म्हटले की, समजूतदार मुलीने पहिल्या भेटीसाठी अनोळखी व्यक्तीसोबत हॉटेलच्या रूममध्ये जाणे अशक्य आहे.
राहुल लहासेला नोव्हेंबर 2021 मध्ये अमरावती येथील सत्र न्यायालयाने IPC, POCSO कायदा आणि IT कायद्याच्या तरतुदींनुसार दोषी ठरवले होते. त्याला 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती गोविंदा सानप यांच्या एकल खंडपीठासमोर याचिकाकर्त्याच्या याचिकेवर सुनावणी झाली. पीडितेच्या साक्षीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खंडपीठाने ही शिक्षा रद्द केली.
राहुल लहासेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता की, मार्च 2017 मध्ये त्याने फेसबुकच्या माध्यमातून अल्पवयीन मुलाची भेट घेतली होती. विद्यार्थिनीला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आणि नंतर तिचे इंटिमेट फोटो शेअर करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्याच्यावर होता.
पीडितेने पुढे आरोप केला की, संबंध संपुष्टात आणल्यानंतर लहासेने (Rape Case) हे फोटो तिच्या कुटुंबीयांना पाठवले. यावर न्यायमूर्ती सानप म्हणाले, ‘पीडितेने सांगितले होते आरोपीने तिच्यासाठी खोली बुक केली होती. ती मुलाला पहिल्यांदा भेटायला जाणार होती पण एखादी समजूतदार मुलगी अशा हॉटेलच्या खोलीत जाणार नाही.
खंडपीठाने म्हटले, ‘मुलाचे असे वागणे नक्कीच धोक्याची घंटा सूचित करते, तरीही, तिने त्याच्यासोबत हॉटेलच्या खोलीत जाणे पसंत केले. पीडितेचे हे वर्तन अशाच परिस्थितीत सामान्यतः विवेकी व्यक्तीच्या वर्तनाशी सुसंगत नाही.