मुंबई : महाविकास आघाडीमध्ये सध्या वाद होताना दिसत (Maharashtra Assembly) आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादविवादाच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. हा वाद मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून निर्माण झाल्याचे म्हंटले जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत MVA कडून मुख्यमंत्री चेहरा कोण असेल? याबाबतचे चित्र स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या गटाकडून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी होत आहे. काँग्रेस याला विरोध करत असून आता उद्धव ठाकरे हे राहुल गांधींच्या सभेपासून दूर राहत असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगलीत सभेला संबोधित केले. वांगी येथे पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी मात्र उद्धव ठाकरे गटाच्या एकाही नेत्याने हजेरी लावली नाही.
राहुल गांधी यांच्या सांगली दौऱ्यात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. परंतु, उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती असल्यामुळे आता चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे येथे केवळ उद्धव ठाकरेच गायब नव्हते तर त्यांच्या गटातील एकही नेता राहुल गांधींच्या सभेला उपस्थित नव्हता.
गेल्या आठवड्यात आमदार विश्वजित कदम यांनी सांगितले होते (Maharashtra Assembly) की ठाकरे यांनी त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे त्यांची उपस्थिती निश्चित केली नाही. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांच्या न येण्याने मात्र त्यांच्यातील दुरावा आणि रुसवा समोर येत आहे.