सांगली : बांगलादेश येथे हिंदूवर होणाऱ्या हल्ल्याप्रकरणी भिडे गुरुजी यांनी बंद (Sambhaji Bhide Guruji) पुकारण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी कोलकाता बलात्कार प्रकरणी संपूर्ण भारतीयांच्या डोळ्यात अंजन घालणारे परखड मत मांडले. यामध्ये गुरुजी म्हणाले, की आपल्या देशात बलात्कार हा प्रकार इतका किळसवाणा वाढत चालला आहे. त्याच्यामध्ये अतिशय कठोर निर्णय घेतला पाहिजे. बंगालमध्ये माताजी म्हणजे आई. ममताजी या देखील आई आहेत. त्या काय करत आहेत? ते कळत नाही. परंतु, एखाद्या स्त्रीवर बलात्कार होणं, केवळ बंगालमध्ये नाही या देशातील कोणतीही स्त्री हे भारतमातेचे रूप आहे. ही भावना प्रत्येक भारतीयांच्या मनात असली पाहिजे. कोणत्याही देशातील स्त्री असो ही आपली आई आहे; ही भावना नसल्यामुळे कोलकत्तासारख्या घटना घडतात.
त्यांनी या बाबत उदाहरण देताना म्हंटले, की द्यूत खेळत असताना शेवटी युधिषटराने द्रौपदी पणाला लावली. सगळीच दानं कौरवांच्या बाजूने पडत होती. त्यावेळी दुर्योधन म्हणाला द्रौपदी आमची झाली. ती आपली दासी आहे, हे स्त्रीधन आपण जिंकले आहे. तिला घेऊन ये. द्रौपदी येत नाही. ती रजस्वला अवस्थेत असते. तीला खेचून घेऊन ये म्हंटल्यावर तिच्या डोक्याचे केस ओढत नीच दुष्यासन तिला फरफटत घेऊन येतो. राजसभेत द्यूत सुरू आहे. द्रोणाचार्य, भीष्माचार्य सगळे बसले आहेत. पण कोणी बोललं नाही. केवळ भीम बोलला, की सहदेवा उठ त्या पणत्या घेऊन याचे हात जाळतो.
कोणत्याही स्त्रीवर बलात्कार म्हणजे मातेवर बलात्कार. असे गुरुजी यांनी निक्षून सांगितले. या देशातील नाही जगातील कोणतीही स्त्री ही हिंदूना भारतमातेसमान आहे. ही श्रद्धा हिंदूंच्या अंतकरणात असेल तर कोणतीही स्त्री ही भारतमातेचे प्रकट रूप आहे. तिच्याशी कसं वागायचे ती आईच! ही भावना नाहीये म्हणून तर बोंब आहे!
स्वातंत्र्यदिनी आपण झेंडा वदंन करतोय; सगळं ठीक आहे पण भारतमातेचे स्वातंत्र्य साजरं (Sambhaji Bhide Guruji) करतोय अशी पोटतीडिक श्रद्धा भावना असलेली माणसं नाहीयेत. तुकाराम महाराजांच्या वाईटावर असलेली माणसे त्या काळात होती. ते वडाच्या झाडाखाली आपला फुटका तंबोरा चिपळ्या घेऊन हरिनामात दंगले होते. ज्या लोकांना तुकाराम महाराजांचे मोठेपण पाहवत नव्हतं त्या लोकांना तुकाराम महाराज किती वाईट आहेत हे दाखवण्यासाठी त्यांना धक्का दे, तंबोरा हिसकावून घे, पागोटे ओढ म्हणजे ते तुला मारायला उठेल. असे एका स्त्रीला उदयोक्त करून पैसे देऊन धाडली. ती गेली. तुकाराम महाराज एका विवेकी एक चित्त होते. तेव्हा महाराज म्हणाले माय असं का करतेस? ती बोलते तुझ्या पासून मला भोग पाहिजे. त्यावर महाराज यांचा उस्फूर्त अंतकरण असलेला अभंग आहे.
पराविया नारी रखुमाईसमान ।
हें गेलें नेमून ठायींचेंचि ॥
जाई वो तूं माते न करीं सायास ।
आम्ही विष्णुदास तैसे नव्हों ||
न साहावें मज तुझें हें पतन ।
नको हें वचन दुष्ट वदों ॥
तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार ।
तरी काय नर थोडे झाले ॥
शेणच खायचे असेल तुला तर अनेक कुत्री पडली आहेत; त्यांच्याकडे जा आम्ही विष्णुदास आहोत हे पाप करणार नाही. ही तुकारामांच्या अंतकरणातील अशी श्रद्धा कोणतीही स्त्री असो ही आई आहे; ही श्रद्धा नसल्याने कलकत्त्यासारखे प्रकरण घडते. त्यामुळे दर दिवशी चार पाच बलात्काराच्या बातम्या असतात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरेख योजना आहे, उत्तम आहे. परंतु, नुसतं मानधन नाही किंवा श्रद्धाधन नाही; तर तिच्या शिलाबद्दल सुद्धा अभिवचन दिले पाहिजे. तुझ्या केसाला जरी धक्का लागला तरी त्याला इहलोकीची यात्रा संपवावी लागेल असं शासन असावे.
माझी मुख्यमंत्र्यांना कळकळीची प्रार्थना आहे; या देशात माता भगिनींसोबत असा व्यवहार (Sambhaji Bhide Guruji) करणं; ज्याला स्वर्गवासी जाण्याची तातडी आहे त्याने करावा; लोकांच्या लक्षात येईल अशी शिक्षा त्यांनी करावी. ते शासन करतील न करतील पण माझे म्हणणे आहे, की लव्ह जिहाद हा जाणीवपूर्वक बलात्कार करण्याचा उघड धंदा आहे. शिवछत्रपती यांनी रांझ्याच्या पाटलाला तीन वेळा बोलवूनही तो आला नाही. शिवछत्रपती म्हणाले तू पाप केलं आहेस; तो नाही म्हणाला. तू खरं बोल म्हंटल्यावर त्याने चूक कबूल केली आणि चुकलं चुकलं म्हणू लागला. त्यावेळी छत्रपती म्हणाले चुकलं नाही; तर त्याचे कोपरा पासून हात आणि ढोपरा पासून पाय वेगळं करा; आणि त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून नदीच्या पलीकडे कोल्हा कुत्र्याला खायला घाला. शिवछत्रपतींचे हे वचन आहे; देव मस्तकी धरावा तशी ही विलक्षण शिकवण धरूनच पराविया नारी रखुमाईसमानच हे धरून राष्ट्र चालले पाहिजे, नाहीतर भारत माता की जय या घोषणेला काय अर्थ आहे?