सांगली : आपण आपल्या घराची मोडतोड करतो का? त्यामुळे बंद हा (Sangli) शांततेत झाला पाहिजे. असे मत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी मांडले असून त्यांनी बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सांगली येथे 25 ऑगस्ट रोजी बंद पुकारणार असल्याचे सांगितले. यासाठी हिंदुत्ववादी तरुण एकत्र येऊन 24 ऑगस्ट रोजी सांगलीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहेत. तसेच हा बंद अत्यंत शांततेत करण्यात येणार आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
या हिंदुस्थानचा जनप्रवाह घेऊन आपल्या महाराष्ट्राचा जीवनगाडा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हाकत आहेत. मोठा कुशल हिंमतवान देशभक्त, धडाडीचा, लोकहितासाठी जागृत असलेला असा सगळं महाराष्ट्र शासनाचा संसार ते चालवत आहेत. राष्ट्र म्हंटल्यावर दरवर्षी नवनवीन समस्याची पालवी समाजाच्या समस्याला फुटत असते. त्या समस्यावर रामबाण उपाय करण्याचे काम चांगल पार पाडत आहेत.
पत्रकार समाजाला कायम जागं ठेवणारा
समाजमनाचे मनोगत जे चालू असेल त्याच्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिवछत्रपतींच्या अंतकरणाचा वृत्तीचा इच्छेचा, ध्येयवादाचा समाज बनावा म्हणून चाललेल्या कामातून जे काम आम्ही करतो त्याचा वेध घेण्यासाठी तुम्ही आलेला आहात. पत्रकार कायम जागं ठेवणारा, दिशा देण्याची इच्छा असलेला धोरणी गोष्टीचा चाणाक्ष वृत्तीचा असतो. आपण जाणीवपूर्वक एकत्र आलो आहोत.
राष्ट्रांच्या पुढे कायम नवनवीन समस्या उभ्या राहतात. 15 ऑगस्ट 1947 साली पाकिस्तान उत्पन्न झाला. त्यावेळी पाकिस्तानचा अविभाज्य भाग म्हणून बांगलादेश उत्पन्न झाला. बांगलादेश राष्ट्र नव्हत. पण रहमान या स्वाभिमानी बांग्लादेशीय पाकिस्तानातल्या समाजसेवकाने पाकिस्तानला निषेध करून स्वतंत्र राष्ट्र जन्माला आणले. त्या राष्ट्राच्या पंतप्रधान आतल्या सगळ्या बेबनावमुळे हिंदुस्थानच्या आश्रयाला आल्या.
सैन्य आणि पंतप्रधान मुसलमान पण अत्याचार हिंदुवर?
फणा काढलेल्या नागाच्या सावलीत बेडूक कधी जात नाही. त्यामुळे त्या दुसरीकडे कुठे गेल्या नाहीत त्या इथेच आल्या. म्हणजे हिंदुस्थानच्या आश्रयाला आल्या. स्वाभाविक आहे. हिंदुस्थानची संस्कृती ही संतांची, जगाच्या कल्याणाची, देशाच्या उपकारांची आहे. अशी वृत्ती असलेला हिंदू समाज (Sangli) असल्याने त्या आल्या. त्या आल्यानंतर बांगलादेशमध्ये ज्या प्रतिक्रिया उमटल्या.. तेथले सैन्य आणि हसिना ताई या देखील मुसलमान पण अत्याचार मात्र हिंदूंवर हा जो मनस्वी संताप घडला त्याचा निषेध व्हावा तसा हिंदुस्थानात निषेध झाला नाही. निषेध म्हणजे तात्काळ ते थांबले पाहिजे अशी भूमिका तरुणांनी घेणे आवश्यक आणि ते समाजाला समजणे आवश्यक अशी भूमिका झाली नाही. मोदी काय अतिशय चाणाक्ष बुद्धिवान; कडवा देशभक्त अत्यंत निस्वार्थ असलेले चांगले व्यक्ती आहेत. पण समाजाची अपेक्षा आहे भारताने काहीतरी घवघवीत पाऊल उचलावे आणि हा राडा थांबवावा. सांगली जिल्ह्यातल्या ज्या ज्या गावात सूर्योदय होत आहे; त्या प्रत्येक गावात अतिकडकडीत बंद पाळावा असे ठरले आहे.
केंद्राकडून अपेक्षा काय?
भिडे गुरुजी यावेळी म्हणाले, की तिथे चाललेला जो नंगानाच आहे, हिंदूवर जे अत्याचार होत आहेत ते बटन दाबल्यानंतर दिवा लागतोही आणि बंदही होतो तसा पटदिशी लोकांच्या लक्षात येईल अशी पावले उचलली पाहिजेत. अशी पावले उचलण्याचे कौशल्य आणि मनोधैर्य भारताच्या सरकारमध्ये आहे. त्यांचे सल्ला डोवाल सारखे जे सैनिकी राजकीय सल्लागार आहेत त्यांच्याकडून त्यांनी घ्यावे.
स्थलांतर नको ग्रहांतर झाले पाहिजे
बांगलादेशमधील हिंदू बांधव तिथेच राहून सुरक्षित राहिले पाहिजे. स्थलांतर नको. तर जे त्रास देत आहेत; त्यांचे स्थलांतर नको ग्रहांतर झाले पाहिजे. अशा मतांचा मी आहे. दरोडेकर घरावर आल्यावर मालकाने स्थलांतर करायचे नसते, तर दरोडेखोरांना मारायचे असते. असा फार महत्त्वाचा संदेश भिडे गुरुजी यांनी बांगलादेशातील हिंदूना दिला आहे.
शेख हसिना यांनी भारतात स्थलांतर घेणे योग्य की अयोग्य?
शेख हसिना यांनी भारतात स्थलांतर घेणे योग्य आहे असे गुरुजी म्हणाले, तसेच पुढे गुरुजी म्हणाले की एकतर त्या माऊली आहेत. माऊलीला आश्रय नसताना मदत करण हा आपल्या हिंदू धर्माचा आत्मा असलेला स्वभाव आहे. पण याचा अन्य राष्ट्राने फायदा घेऊ नये. सगळी राष्ट्र हिंदुस्थानच्या वाइटावर टपुन बसलेले आहेत. जगामध्ये कोणताही राष्ट्र हिंदुस्थानचा मित्र नाही.
सरकार अतिशय चांगलं आणि देशभक्त असल्याने त्यांनी देशाच्या राष्ट्राच्या (Sangli) धर्माच्या कल्याणार्थ अत्यंत कठोर पावले उचलावीत. संघटनाच नव्हे तर देशातील सगळ्या राजकारण्यांनी आपला स्वार्थ बाजूला टाकून देशाच्या कल्याणार्थ बांगलादेशात चाललेल्या अत्याचारा विरुद्ध खवळून उठले पाहिजे. पण हिंदूंच्या रक्तात धर्म भक्ति, देशभक्ती, सत्व स्वाभिमान, मातृभूमीबद्दल पोट तीडिक भावना नसल्यामुळे सगळ्यांची तोंडं मुकी झालीत. कुठल्या पुढाऱ्याचे वक्तव्य सांगा, बांगलादेशात झालेल्या नरसंहारवर कोणी बोलतंय का? असे गुरुजी म्हणाले.