हिंदकेसरी न्यूज : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर (Santosh Deshmukh Murder) हत्या करण्यात आली. त्याचे फोटो आणि व्हिडिओ बाहेर पडल्यावर समाजात संतापाची लाट उसळली. यामध्ये धनंजय मुंडे यांचा निकटवर्तिय वाल्मीक कराड हाच सूत्रधार असल्याचे समोर आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला. या प्रकरणावर आता कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी वक्तव्य केले असून आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच आहे असे म्हंटले आहे.
काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बाहेर पडले, यामुळे केवळ या प्रकरणातील आरोपींचेच नाही तर या आरोपींना पोसणाऱ्या, पाठीशी घालणाऱ्या अनेकांचे चेहरे व या चेहऱ्यांमागची विकृती उघडी पडली आहे. या क्रूर गुन्हेगारांचा आश्रयदाता धनंजय मुंडेच असल्याचे जाहिरपणे सांगून नि:पक्षपातीपणे या प्रकरणाचा तपास व्हावा, यासाठी धनंजय मुंडेला मंत्रीपदच देऊ नये, अशी मागणी आम्ही अडीच महिन्यांपूर्वी केली होती. मात्र लोकभावना बासनात गुंडाळून मुंडेला मंत्रिपद दिले गेले.
राजीनाम्याच्या मागणीकडेही अडीच महिने दुर्लक्ष केले गेले. किंचितही नैतिकता असती (Santosh Deshmukh Murder) तर अडीच महिन्यांपूर्वीच हा राजीनामा दिला गेला असता. मंत्रिपदाचे कवच घालून आरोपपत्र दाखल होण्याची वाट पाहत होता का ? आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच आहे!
Santosh Deshmukh Murder : मोठी बातमी! धनंजय मुंडे यांनी दिला राजीनामा! देवगिरी बंगल्यावर तातडीची बैठक