पुणे : पुण्यातील ससुन रुग्णालय हे आता गुन्हेगारीचे केंद्र (Sassoon Hospital) बनले आहे. ड्रग्ज प्रकरण असो वा भ्रष्टाचार ससुन रुग्णालय गैरकारभारांसाठी नेहमीच चर्चेत असते. यावेळी तर मोठा धक्कादायक प्रकार रुग्णालयातून समोर आला आहे. ससूनमध्ये उपचारासाठी दाखल बेवारस रुग्णांना तेथील डॉक्टर्स अज्ञात स्थळी सोडून देत असल्याचा प्रकार एका सामाजिक संस्थेमार्फत समोर आले आहे. एका अपंग व्यक्तीला डॉक्टरनेच चक्क अज्ञातस्थळी सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड आणि रितेश गायकवाड यांनी सापळा रचून हा प्रकार निदर्शनास आणून दिला.
सविस्तर माहिती अशी, की आधार फाउंडेशनचे दादासाहेब आणि रितेश गायकवाड यांच्या कानावर अशा घटना येत होत्या. त्यामुळे त्यांनी सापळा रचला. एका बेवारस रुग्णाला त्यांनी एक महिन्याआधी रुग्णालयात दाखल केले होते. रितेश गायकवाड रिक्षा घेऊन ससुनच्या बाहेर असताना डॉक्टर आदी तेथे आले. त्याने बेवारस रुग्णाला निर्जन स्थळी सोडण्यासाठी सांगितले. यावर मला एकट्याला हे काम जमणार नाही. तुमचा माणूस द्या असे रितेश यांनी सांगितल्यावर एक हॉस्पिटल कर्मचारी आणि डॉक्टर आदी स्वत: रितेश यांच्या सोबत गेले.
रितेश यांनी आधार फाउंडेशनच्या दादासाहेब गायकवाड यांना ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की जर ते पेशंटला चांगल्या ठिकाणी सोडून त्यांची पुढील व्यवस्था करत असतील तर आपले काम सफळ आहे. तुम्ही नेमके काय घडतंय याचा मागोवा घ्या.
यानंतर या पेशंटला विश्रामबाग पोलिस चौकात एका झाडाखाली सोडण्यात आले. यावेळी रितेश यांनी आदी याला या घटनेबद्दल विचारले असता त्याने सांगितले की आम्ही रोज रात्री असे बेवारस 2-3 रुग्ण सोडत असतो. त्यासाठी काही रिक्षावाले त्यांची मदत करतात. आज तो गावी गेला आहे. तो 500-1000 मध्ये काम करून देतो. या रुग्णाला अत्यंत वाईट परिस्थिती मध्ये सोडून देण्यात आले. भारतीय संस्कृतीमध्ये डॉक्टरला देव मानले जाते. पण आता रक्षकच भक्षक होत असल्याचे प्रकार ससुनमध्ये (Sassoon Hospital) घडत आहे.
ससून रुग्णालयातील गैरकारभाराच्या एकाहून एक कथा बाहेर येत आहेत. आता ससूनमध्ये उपचारासाठी दाखल बेवारस रुग्णांना तेथील डॉक्टर्स अज्ञात स्थळी सोडून देत असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रसारीत केले.हि बाब अतिशय गंभीर आणि माणुसकीला काळीमा फासणारी (Sassoon Hospital) आहे. ससून हे रुग्णालय गोरगरीब, अनाथ रुग्णांना जीवनदान देणारे आणि अत्युच्च सेवाभाव जपणारे रुग्णालय म्हणून ओळखले जाते.याशिवाय या रुग्णालयात दर्जेदार सेवा देणारे सेवाभावी वृत्तीने काम करणारे डॉक्टर्स व कर्मचारी आहेत. परंतु काही लोकांमुळे या संपूर्ण संस्थेच्या विश्वासार्हता व लौकीकावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.ससूनमध्ये सातत्याने अशा पद्धतीचे प्रकार घडत असतील तर हे संतापजनक आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी ससून रुग्णालयाच्या संदर्भाने तातडीने लक्ष घालून येथील व्यवस्थेचा आढावा घेण्याची गरज आहे. – खासदार सुप्रिया सुळे
Pune Crime : शाळेच्या शिपायाकडून अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार; शिक्षकाच्या पुढाकाराने आरोपी ताब्यात