हिंदकेसरी : शिवानी पवार हे नाव तुम्ही कधी फारसे ऐकले नसेल. कदाचित तुम्ही तिला फोटोत (Shivani Pawar) कधी बघितले नसेल. कारण एकतर ती जंतरमंतरवर बसली नसेल किंवा मिडीयाला तिला कव्हर करायला सांगण्यात आलं नसेल. सव्वीस वर्षाची ही मुलगी सीमा सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल आहे. शिवानी देखील शेतकऱ्याची मुलगी आहे. मध्य प्रदेश मधल्या ऊमरेड नावाच्या खेडेगावतून ही मुलगी आली आहे.
बरं, आज ह्या मुलीबद्दल लिहायचं काय कारण? शिवानी पण एक कुस्ती खेळाडू आहे. तीन वर्षांपुर्वी तेवीस वर्षांखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पन्नास किलो वजन गटात शिवानीला रौप्य पदक मिळालं होतं. ह्याच स्पर्धेत अंजूला ब्राँझ मिळालं होतं. ह्या स्पर्धेत पदक मिळवणारी शिवानी पहिली भारतीय खेळाडू आहे. शिवानीने जागतिक पोलीस क्रिडा स्पर्धेत सुवर्ण आणि आशियाई कुस्ती स्पर्धेत ब्राँझ पदक मिळवलं आहे.
शिवानी ही भविष्यात नाव काढेल अशी कुस्ती खेळाडू आहे. पण मग शिवानी ऑलिंपिकमध्ये कशी नाही दिसली?
मार्च महिन्यात पतियाला इथे चाचणी स्पर्धा झाली होती. ह्या स्पर्धेत विनेश फोगाट तिच्या नेहमीच्या त्रेपन्न किलो गटात अंजूकडून हरली. ही वर ऊल्लेख झालेलीच अंजू. मग नेहेमीच्या त्रेपन्न किलो गटात हरल्यावर विनेशनी हट्ट धरला की तिला पन्नास किलोची चाचणी स्पर्धा पण खेळायची आहे.
दबावाला बळी पडून अधिकार्यांनी तिला मान्यता दिली. (बलात्कार किंवा लैंगिक शोषणाच्या आरोपांची (Shivani Pawar) भिती वाटली असेल कदाचित. किंवा जंतरमंतरचा धाक दाखवला असेल). पन्नास किलो गटात मात्र विनेश जिंकली. त्रेपन्न किलोची खेळाडू पन्नास किलोमध्ये जिंकणं सोप्प होत असणारच!
अंतिम फेरीत 10-6 ने विनेश जिंकली. म्हणजे समोरची खेळाडू लेचीपेची नक्कीच नव्हती. ती समोरची खेळाडू होती शिवानी पवार. जर विनेशनी पन्नास किलो चाचणीत भाग घेतला नसता तर नक्कीच शिवानी पात्रता फेरी जिंकून ऑलिंपिकला निवडली गेली असती. पण, त्रेपन्न किलो गटात हरल्यावर विनेशनी पन्नास किलो गटात घुसखोरी केली.
खरंतर विनेशची ईच्छा होती की चाचणी न घेताच ऑलिंपिकला पाठवावं. असोसिएशनी ती अवाजवी मागणी मान्य केली नाही . एखादा मर्जीतला आणि जाट अध्यक्ष असता तर असोसिएशनला मान्य करावंच लागलं असतं कदाचित. पण जाट अध्यक्ष करायचं जुगाड पण जमलं नाही .
ऑलिंपिकला तर जायचंच होतं. आणि विरोधी पक्षांचा पाठींबा पण होताच. मग विनेश घुसली पन्नास किलो गटात. विनेश पन्नास किलो गटात घुसल्यामुळे शिवानीची संधी गेली आणी तिच्यावर अन्याय झाला हे नाकारणं अशक्य आहे.
पण अन्यायायाने ऑलिंपिक स्पर्धेत जागा तर मिळवली तरी त्रेपन्न किलो वजन गटातिल खेळाडूही वजन कमी करून देखील सलग दोन दिवस पन्नास किलो वजन गटात बसणं अवघंडच. शेवटी आज वजनकाट्यावर सत्य समोर आलंच. विनेश पन्नास किलो गटात अपात्र झाली कारण मुळात तो तीचा वजनी गटच नाही. पॅरीसमधे जंतरमंतर नाही, हिंदी पत्रकार पण नाहीत. स्वाभाविकच विनेशला अपात्रता मान्य करावी लागली.
ह्या सगळ्या प्रकारात अन्याय झाला शिवानी पवारवर! शिवानी देखील भारतीय आहे. ती ऑलिंपिकला गेली असती आणि मेडल मिळवलं असतं तर ते मेडल भारताच्याच नावासमोर लागणार होतं. विनेश अपात्र झाल्याचं दु:ख नाही कारण ती खोटेपणा करूनच घुसली होती. भारताचं एक मेडल गेलं, देशाला मान खाली घालायला लागली ह्याचं दुखः मात्र आहे. ईलीट खेळाडूंच्या राजकारणात एका नवीन खेळाडूवर अन्याय झाला याचं त्याहून जास्त दुखः आहे.
आणि विनेशच्या अपात्रतेसाठी विधवाविलाप करणाऱ्यांना पण भारताचं मेडल हुकल्याचं दुखः नाहीये. दु:ख आहे मोदींना टार्गेट (Shivani Pawar) करायची संधी हुकल्याचं!
शिवानी महिला खेळाडू नाही का? का भारतीयच नाही? योग्य संधी मिळणं हा तिचा अधिकार नाही का? तुम्हाला काय वाटतं? शिवानीवर अन्याय झाला का नाही? आणि झाला तर त्याला जबाबदार कोण?
खेळात पण घराणेशाही आणि राजकारण येणं क्रिडा क्षेत्राला फायद्याचं आहे का?
शोधन भावे