बदलापूर : बदलापूर येथील लहान मुलींवरील लैंगिक (Badlapur) प्रकरणामध्ये आता काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पीडित मुलांच्या कुटुंबियांकडून हे खुलासे समोर आले आहेत. तर दुसरीकडे न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाला चांगलेच फटकारले आहे. लोकांनी रस्त्यावर उतरण्यापर्यंतची वाट तुम्ही पाहाता का? असा जाब देखील विचारला आहे.
सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने मुलांवर अत्याचार केल्याचे पालकांना समजले. मुलांनी सांगितलेली हकीकत डॉक्टरांच्या मार्फत कन्फर्म झाल्यावर पालक तो अहवाल घेऊन शाळेत घेऊन गेले असता मुख्यध्यापकांनी तो अहवाल फेटाळत म्हंटले, की शाळेत असा प्रकार झाला नसेल. मुलीना सायकलमुळे प्रायव्हेट पार्टला दुखापत झाली असेल किंवा शाळेतून बाहेर असे काहीतरी घडले असेल. आपल्या शाळेवर दूषण येऊ नये यासाठी मुख्यध्यापकांनी सारवासारव केल्याचे पीडित कुटुंबाने सांगितले.
तर दुसरीकडे हे प्रकरण दडपण्यासाठी एका महिला पोलिसाने शाळा (Badlapur) व्यवस्थापनाबरोबर गुप्त बैठक घेतल्याचेही पीडितेच्या पालकांनी सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणी अधिक सखोल चौकशी होणार असल्याचे समोर येत आहे.