• About Us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6
hindakesari.com
Advertisement
  • वेगवान बातम्या
  • महाराष्ट्र
    • शहर
    • कोकण
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • आंतरराष्ट्रीय
  • सत्ताकारण
  • अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • इतर
    • अध्यात्म
    • शिक्षण
    • विज्ञान
    • आरोग्य
    • क्रीडा
    • खाऊगल्ली
No Result
View All Result
  • वेगवान बातम्या
  • महाराष्ट्र
    • शहर
    • कोकण
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • आंतरराष्ट्रीय
  • सत्ताकारण
  • अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • इतर
    • अध्यात्म
    • शिक्षण
    • विज्ञान
    • आरोग्य
    • क्रीडा
    • खाऊगल्ली
No Result
View All Result
hindakesari.com
No Result
View All Result
  • वेगवान बातम्या
  • महाराष्ट्र
  • आंतरराष्ट्रीय
  • सत्ताकारण
  • अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • इतर
Home ऐतिहासिक

Sindhudurg : ‘याचसाठी का केला होता अट्टहास हिंदवी स्वराज्याचा?’

Admin by Admin
August 29, 2024
in ऐतिहासिक
0
Sindhudurg Shivaji Maharaj
0
SHARES
31
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सिंधुदुर्ग : मालवण येथील राजकोट येथे बांधलेला (Sindhudurg) छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. यावर अनेक स्तरातून सामाजिक आणि राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. या संपूर्ण परिस्थितीवर लेखक चंदन विचारे यांनी लिहिलेला डोळ्यात अंजन घालणारा लेख नक्की वाचा..

माझ्या जीवाभावाच्या सवंगड्यानो, मावळ्यांनो आज तुमची खूप आठवण येत आहे. आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून प्राणपणाने तुम्ही हे गडकोट लढवले. प्रसंगी हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या या महायज्ञात तुम्ही समिधा होऊन स्वतःची आहुती दिलीत. स्वराज्याचा संसार थाटण्यासाठी तुम्ही एका हाती तुळशीपत्र आणि दुसऱ्या हाती निखारा घेऊन मला जणू विचारत होतात कि, सांगा राजं यातलं आमच्या घरादारावर नेमकं काय ठेऊ? तुमच्यासारखी जिवाभावाची, जीवाला जीव लावणारी, माझ्यासाठी, स्वराज्यासाठी जीव घेणारी अन लढता लढता हसत जीव देणारी माणसं होती म्हणून आणि म्हणूनच सह्याद्रीसुद्धा तुमचा पाठीराखा झाला.अन्यथा या सह्याद्रीत पाय ठेवण्याची कुणाची काय मजाल. हे दिव्य पार पाडावं ते केवळ वाघ, वारा अन माझ्या लढवय्या मरहट्ट्यानीच.

बाजी तुम्ही, बांदल वीर अन असंख्य ज्ञात अज्ञात वीरांनी गजापूरची घोडखिंड तुमच्या रक्ताने पावन केलीत. माझ्या तान्ह्याने तर त्याच्या लाडक्या लेकाचे, रायबाचे लग्न बाजूला ठेवून आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं म्हणत कोंढाणा स्वराज्यात परत आणला पण पण या कामगिरीत मी माझा सिंह मात्र कायमचा गमावला. माझ्या एका पत्राने पेटून उठत प्रतापराव त्यांच्या मोजक्याच सहकाऱ्यांसमवेत बेहलोल खान आणि त्याच्या सैन्यावर तुटून पडले. माझा शिवा काशीद तो तर चक्क शिवाजी होऊनच गेला. नेताजी, येसाजी, मुरारबाजी, हिरोजी, हंबीरराव किती अन कुणाकुणाची नावं घ्यावी. तुमची नुसती नावे ओठी आली तरी डोळ्यांच्या कडा पाणावतात.

रायगडावर हिंदवी स्वराज्याच्या, बत्तीस मण सोन्याच्या सिंहासनावर (Sindhudurg) छत्रपती होऊन मी बसलो खरा पण त्या सिंहासनापर्यंत मला घेऊन जाणारी एक एक पायरी तुम्ही होतात. श्रींचे हे स्वप्न तुमच्यामुळेच तर आकाराला आले.

आज या साऱ्याचं सिंहावलोकन करण्यास कारण कि, नुकतीच राजकोट, मालवण येथे चक्क माझ्याच पुतळ्याबाबत घडलेली दुर्दैवी घटना. जिथे माझ्या पुतळ्याची अवघ्या आठ महिन्यात झालेली हि अवस्था तिथे ऊन, वारा, पावसाचे, लाटांचे असंख्य तडाखे सोसत साडेतीनशे वर्षांपासून उभे असलेल्या आपल्या गडकोटांची काय गत.

Mumbai : अंधेरीतील गावदेवी माता दहीकाला पथकाचा सलग दोन वर्षे आठ थरांचा थरार; आठ थर लावणारे अंधेरीतील पहिले पथक

मी सारं सारं पाहतोय. कुठल्या तोंडाने सांगू आबा अन आऊसाहेबांना? काय वाटेल त्यांना. कसली भव्यदिव्य स्वप्नं होती त्यांची या स्वराज्याप्रती अन आज त्याची काय हि अवस्था ? कुठे ते खांद्याला खांदा लावून एका भगव्याखाली स्वराज्यासाठी लढलेले अठरा पगड जातीतले मावळे अन कुठे आताचे जातीपतीत विभागून गेलेले?

अनेक वर्ष उपेक्षित असलेल्या गडकोटांकडे कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संवर्धकांची पाऊले वळली. पदरमोड करून प्रत्येकाने त्यांच्या पूर्वजांनी लढवलेल्या, प्राणपणाने जपलेल्या या गडकोटांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला खरा पण कालांतराने अंतर्गत राजकारण आणि राजकारण्यांमुळे दुर्गसंवर्धनासारख्या पवित्र कार्याचासुद्धा आज खेळखंडोबा होऊन बसलाय. राजकारणाच्या या वाळवीने हे क्षेत्रसुद्धा पोखरायचे सोडले नाही.

स्वभाषा, स्वधर्म, स्वराज्य, स्वाभिमान याची किंचितशी देखील चाड नसणारे आज माझ्याच नावाने मतांची भिक मागत फिरत आहेत, माझ्या नावाखाली निवडणुका लढवत आहेत. रयतेच्या काडीलाही धक्का लावू नका असं माझ्या सैन्याला उद्देशून लिहिलेलं पत्र यांनी चक्क बासनात गुंडाळून ठेवलं. कमिशनच्या चिरीमिरीसाठी यांनी आता फक्त राज्यच विकायचं तेवढं बाकी ठेवलं असं वाटतं. कंत्राटं काढणं आणि जन्मसिद्ध हक्क असल्याप्रमाणे त्यातून निर्लज्जपणे कमिशन मागणं हे आता जणू आद्यकर्तव्यच होऊन बसलंय काहींच. भ्रष्टाचार जणू यांच्या जीवनाचा, कामाचा भाग होऊन बसलाय. हे हे असं किती अन कुठवर सहन करायचं ?

काल राजकोटवर घडलेला प्रसंग तर आणखी चीड आणणारा.आरोप -प्रत्यारोप, काय ती बेताल वक्तव्ये, काय ती पातळी सोडलेली भाषा, स्वकियांनीच स्वकियांवर उगारलेले हात, एकमेकांना केली गेलेली शिवीगाळ, अडवलेल्या वाटा.

मध्यन्तरी आमच्यावर एक मालिका आली होती ज्यात आऊसाहेबांच्या ओठीचा एक संवाद संवादलेखकाने अतिशय छान लिहिला होता. (Sindhudurg)
‘हे हे सुलतान आपआपसात लढतात अन मरतात मात्र मराठे.’

काल सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उडालेली राजकीय चकमक पाहिली अन आम्हाला चटकन ते आठवलं.

राजकारण्यांच्या घाणेरड्या राजकारणात भरडली जाते आमची रयत. पण त्याचे कुणालाच सोयर सुतक नाही. म्हातारी मेल्याच दुःख नाही पण काळ सोकावत जातो तो हा असा.

बेताल वक्तव्ये करणारे राजकीय पुढारी, फरार गुन्हेगार, अत्याचारी, लाचखाऊ भ्रष्टाचारी कुणाकुणाचा म्हणून कडेलोट अन चौरंगा करायचा? यांची मोजदाद करायची म्हटली तर माझ्या साडेतीनशे गटकोटांवर भल्यामोठया रांगाच लागतील.

हे सर्व पाहिलं कि, राहून राहून एकच प्रश्न पडतो.
याचसाठी का केला होता अट्टहास हिंदवी स्वराज्याचा?

गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना पहिल्यानंतर आज महाराजांना हे असंच वाटत असावं हो ना? – ©चंदन विचारे.

Tags: Author Chandan VikhareChhatrapati Shivaji MaharajMalvanRajkotSindhudurg
Previous Post

Mumbai : अंधेरीतील गावदेवी माता दहीकाला पथकाचा सलग दोन वर्षे आठ थरांचा थरार; आठ थर लावणारे अंधेरीतील पहिले पथक

Next Post

Palghar : सिंधुदुर्ग शिवरायांच्या पुतळ्या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी मागितली माफी

Next Post
Palghar Modi Sindhudurg

Palghar : सिंधुदुर्ग शिवरायांच्या पुतळ्या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी मागितली माफी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
Uran

Uran : माणुसकिला काळिमा फासणारी घटना; तरुणीच्या शरीराचे केले तुकडे; लव्ह जिहादातून षडयंत्र

July 27, 2024
Kolkata Rape Case

Kolkata : कोलकाता बलात्कार प्रकरणातील पोस्टमॉर्टम अहवालात 5 वेदनादायी खुलासे; चष्म्याचे तुकडे देखील डोळ्यात घुसले!

August 17, 2024
Dharavi : भररस्त्यात पोलिसांसमोरच हिंदू तरुणाची हात कापून निर्घृण हत्या

Dharavi : भररस्त्यात पोलिसांसमोरच हिंदू तरुणाची हात कापून निर्घृण हत्या

July 30, 2024
Badlapur Rumor: चिमुकल्यांची तब्येत आईसह व्यवस्थित; समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

Badlapur Rumor: चिमुकल्यांची तब्येत आईसह व्यवस्थित; समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

August 22, 2024
97 टक्के गुण असूनही एडमिशन मिळेना ; विद्यार्थिनीच्या ट्विटवर आरक्षणाचा मुद्दा वादात!

97 टक्के गुण असूनही एडमिशन मिळेना ; विद्यार्थिनीच्या ट्विटवर आरक्षणाचा मुद्दा वादात!

0
खोट्या माहितीचा आयआरसीटीसीला फटका; नियमात कोणतेही बदल नाहीत

खोट्या माहितीचा आयआरसीटीसीला फटका; नियमात कोणतेही बदल नाहीत

0
श्रीराम मंदिर हा राष्ट्रीय पुनरुत्थानाचा क्षण आहे…

श्रीराम मंदिर हा राष्ट्रीय पुनरुत्थानाचा क्षण आहे…

0
ऑलिम्पिकच्या तक्त्यावर पहिला कुस्तीपटू – खाशाबा जाधव

ऑलिम्पिकच्या तक्त्यावर पहिला कुस्तीपटू – खाशाबा जाधव

0
Rambhau Mhalgi Prabodhini : समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी – डॉ. विनय सहस्रबुद्धे

Rambhau Mhalgi Prabodhini : समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी – डॉ. विनय सहस्रबुद्धे

May 2, 2025
Maharashtra Budget 2025 :  जाणून घ्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे

Maharashtra Budget 2025 : जाणून घ्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे

March 10, 2025
Dhule : शिरपूर धारकरी मारहाण प्रकरणी पोलीस निरीक्षकाचे निलंबन

Dhule : शिरपूर धारकरी मारहाण प्रकरणी पोलीस निरीक्षकाचे निलंबन

March 9, 2025
Dhule shivpratishthan hindusthan

Dhule : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्याला विनाकारण मारहाण करणे पडले महागात; पोलिस उपनिरीक्षकाची तात्काळ बदली

March 8, 2025

Recent News

सध्याच्या आधुनिक युगात बातम्या, घडामोडी, माहिती सर्व ऑनलाइन झाले आहे.
कोणतीही माहिती सहजच एका क्लिकवर वेबसाईटवर उपलब्ध होते.
सोशल मीडिया हा अनेक वेबसाईटने वृद्धिंगत होत चालला आहे. त्यामध्येच आमची ‘हिंदकेसरी’ ही वृत्तसंस्था येते.

Follow Us

Browse by Category

  • Apps
  • Entertainment
  • Recent News
  • Sports
  • Tech
  • Uncategorized
  • अध्यात्म
  • अर्थकारण
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • इतर
  • ऐतिहासिक
  • कोकण
  • क्रीडा
  • क्रीडा
  • गुन्हेगारी
  • चंदेरी दुनिया
  • देश – विदेश
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • वेगवान बातम्या
  • शहर
  • शिक्षण
  • शेती
  • सत्ताकारण

Recent News

Rambhau Mhalgi Prabodhini : समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी – डॉ. विनय सहस्रबुद्धे

Rambhau Mhalgi Prabodhini : समाज माध्यमांवर प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन ‘ओरिजिनल’ आणि कसदार अभिव्यक्ती व्हावी – डॉ. विनय सहस्रबुद्धे

May 2, 2025
Maharashtra Budget 2025 :  जाणून घ्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे

Maharashtra Budget 2025 : जाणून घ्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे

March 10, 2025
  • About Us
  • Home 1
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Home 6

© 2024 Hinda Kesari - Meta Bay Meta Bay | 9029508907.

No Result
View All Result
  • वेगवान बातम्या
  • महाराष्ट्र
    • शहर
    • कोकण
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • आंतरराष्ट्रीय
  • सत्ताकारण
  • अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • इतर
    • अध्यात्म
    • शिक्षण
    • विज्ञान
    • आरोग्य
    • क्रीडा
    • खाऊगल्ली

© 2024 Hinda Kesari - Meta Bay Meta Bay | 9029508907.

error: Content is protected !!