पालघर : जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात वेहेलपाडा (Palghar) येथे गौरी मनोज चौधरी या विद्यार्थिनीला गारद फाऊंडेशन,ठाणे यांच्या माध्यमातून मोनिषा डागा ह्यांच्या तर्फे स्पोर्ट्स बॅग देण्यात आली. तसेच स्पोर्ट शूज आणि स्पोर्ट ड्रेसची ही सोय करण्यात आली आहे. ती संस्थेमार्फत लवकरच गौरीकडे सुपूर्त करण्यात येतील.
गौरी मनोज चौधरी ही सध्या जिल्हा परिषद शाळा,वेहेलपाडा येथे इयत्ता पाचवीत शिकत आहे. अवघ्या १० वर्षाच्या गौरीने कोल्हापूर , सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत धावणे आणि मॅरेथॉन शर्यती अशा खेळांमध्ये भाग घेत पालघर जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे. परंतु अत्यावश्यक क्रीडा साहित्याच्या अभावामुळे गौरीच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीत अडथळा निर्माण होत असल्याचे तेथील स्थानिक कार्यकर्ते सचिन लोखंडे यांच्या लक्षात आले. त्यानंतर लोखंडे यांच्या प्रयत्नाने गारद फाऊंडेशनच्या माध्यमातून गौरीला स्पोर्ट्स बॅग देण्यात आली आहे.तसेच धावण्यासाठी लागणारे अनुकूल असे साहित्य हि लवकरात लवकर मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.तसेच तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्वोतोपरी मदत करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
Delhi : सुटकेनंतरही अरविंद केजरीवाल यांच्या समस्या कायम; निवडणूक जवळ असताना निर्बंधांचा सामना
दरम्यान, वेहेलपाड्यासारख्या दुर्गम ठिकाणी शिकत असलेल्या (Palghar) खेळाडू विद्यार्थ्यांमध्ये विविध क्षमता असूनही गौरी सारखे अनेक विद्यार्थी सुविधांअभावी मागे पडतात. क्रीडा साहित्य खरेदीसाठी पैसे नसल्याने खेळू शकत नसल्याची खंत विद्यार्थ्यांमध्ये होती. तर आता अशा आणखी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मदत करणे आणि त्यांच्या या इवल्याशा पंखांना भरारी घेण्यासाठी पाठबळ देणे हेच गारद फाऊंडेशनचे उद्दिष्ट आहे.