पिंपरी चिंचवड : हिंजवडी लक्ष्मी चौक (Hinjawadi) येथे बंदुकीचा धाक दाखवून दिवसाढवळ्या सराफा दुकान लुटल्याची घटना घडली. हि घटना अतिशय गंभीर आणि पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेचे खरे स्वरूप दर्शविणारी आहे. भरदिवसा पुण्यात गोळीबार होऊ शकतो, भरदिवसा सर्वांच्या डोळ्यांदेखत दरोडा पडू शकतो. थोडक्यात गुन्हेगार निर्ढावले असून पुण्यात कुणीही सुरक्षित नाही हे दिवसेंदिवस स्पष्ट होऊ लागले आहे. गृहमंत्री महोदय, कृपया आपल्या खात्याकडे लक्ष द्या. विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्याची कायदा सुव्यवस्था ‘आयसीयू’मध्ये आहे. अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
Karad : प्रेयसीला फ्लॅटवर बोलवले आहे; अन् इमारतीवरून ढकलून दिले; तरुणीचा जागीच मृत्यू
सविस्तर माहिती अशी, की आज हिंजवडी येथे पिस्तूलाचा (Hinjawadi) धाक दाखवून सराफाला मारहाण करत चोरट्यांनी भरदिवसा ज्वेलर्समध्ये दरोडा घातला. त्यानंतर त्यांनी किंमती वस्तू चोरून नेल्या. ही घटना शिवमुद्रा ज्वेलर्स मध्ये घडली. पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे. परंतु, अशा घटना पुण्यात वाढल्या असल्याने पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.