ठाणे : आज मुसळधार पावसाचा वेग कायम आहे. पावसाचा (Thane)जोर कमी होत नसल्याने सर्वत्र पाणी भरले आहे. पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने तसेच अतिवृष्टीचा धोका असल्याने ठाण्यातील पहिली ते बारावी पर्यंत सर्व शाळांना तात्काळ सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
महाडचा दादली पूल वाहतुकीसाठी बंद
तसेच सकाळी ज्या शाळा सुरू झाल्या होत्या त्या शाळेतील (Thane) शिक्षकांनी पालकांशी संपर्क करून विद्यार्थ्यांना घरी सुखरूप पोहचवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ठाण्यात मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवन ठप्प झाले आहे. तर हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने गरज असल्यास बाहेर पडला अन्यथा टाळा. असे आवाहन देखील करण्यात आले आहे.