उरण : माणुसकीला काळिमा फासणारी (Uran) धक्कादायक घटना आज उरण येथे घडली. या घटनेने उरणमध्ये सर्वांचीच झोप उडाली आहे. एका 22 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिचे स्तन कापून तसेच तिच्या गुप्तांगावर वार करून तिचा खून करण्यात आला आहे. पेट्रोल पंपाच्या शेजारी तिचा मृतदेह सापडला असून तिचा मृतदेह इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊद शेख असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,खून झालेल्या तरुणीचे नाव यशश्री शिंदे असे आहे. गुरुवारपासून ही तरुणी बेपत्ता होती. तिचे आणि आरोपीचे प्रेम संबंध होते. यातूनच ही हत्या करण्यात आली आहे. आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपी अजूनही फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली आहेत.
Navi Mumbai : बेलापूरमध्ये तीन मजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू तर अजून दोन जणांचा शोध सुरू
तर नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार; या मुलीचा (Uran) खून दाऊद याने केला आहे. 2019 साली उरणमध्ये त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानेच तीला गायब करून या पोलिस तक्रारीचा बदला घेण्यासाठी षड्यंत्र रचल्याचे म्हंटले आहे. आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांच म्हणणे आहे.