पुणे: कोविडनंतर भारतात अनेक आजारासंबंधी घटना (Pune) वाढत आहेत. दैनंदिन जीवनक्रम बदलल्याने सध्या हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. या आधी हृदयविकाराच्या झटक्याचे वय हे साधारण चाळीशी उलटल्यावर असायचे परंतु, आता तरूणांपासून लहान मुलांपर्यंत हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आता शाळा-महाविद्यालयांमध्येही अशी प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. अशीच एक घटना पुण्यातील उंड्री येथे घडली असून एका दहावीतल्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. ही घटना संस्कृती स्कूलमध्ये घडली.
Badlapur : पीडित कुटुंबियांकडून मुख्यध्यापक आणि महिला पोलिसांवर धक्कादायक आरोप
ही विद्यार्थीनी वर्गात शिकण्यासाठी जात असताना अचानक खाली पडली. तिला ताबडतोब वानोरी येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये नेण्यात आले, परंतु तेथे पोहोचताच तीला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर पुढील तपासासाठी तिला ससून रुग्णालयात हलवण्यात आले.
शाळेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थीनी वर्गात (Pune) जात असताना अचानक बेशुद्ध पडली. घटनास्थळी उपस्थित शिक्षकांनीही तिला रुग्णालयात नेण्यापूर्वी शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सध्या तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.