HDFC Bank : भारतात UPI पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत आहे. तुम्ही जर UPI पेमेंटचा जास्त वापर करत असाल आणि तुम्ही HDFC बँकेचे युजर आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण 4 ऑगस्ट 2024 रोजी HDFC बँकेचे UPI app बंद असणार आहे. HDFC बँकेने शेड्यूल डाउनटाइम अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत, कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन पेमेंट बंद केले जाईल, परंतु यासाठी देखील वेळ निश्चित करण्यात आली आहे.
Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये भेदभाव; महिला बॉक्सरची 46 सेकंदातच माघार; नेटकरी आयोजकांवर भडकले
बँक दिलेल्या अधिसूचने नुसार, रात्री 12:00 ते पहाटे 03:00 पर्यंत सिस्टम देखभालीचे काम केले जाईल आणि या दरम्यान सर्व ऑनलाइन पेमेंट बंद राहतील. म्हणजे एकूण 180 मिनिटांसाठी असे पेमेंट थांबवले जाईल. याचा परिणाम सर्व खातेदारांवर होणार आहे. यामध्ये बचत आणि चालू खातेधारक दोन्ही व्यवहार करू शकणार नाहीत.