Waqf Board : वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावरून मोदी सरकार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. वक्फ बोर्ड रद्द व्हावे किंवा काही अटी बसाव्या यासाठी केवळ हिंदू नाहीतर अनेक मुस्लिम संघटना, मुस्लिम जाती पुढारल्या आहेत. हा मुद्दा सध्या देशभर गाजत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारने वक्फ (दुरुस्ती) विधेयक, 2024 सादर केले होते. मात्र हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. ते विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आले आहे. तेव्हापासून वक्फची चर्चा होत आहे. त्यासाठी आपण जाणून घेऊया, वक्फ बोर्ड म्हणजे काय? आणि वक्फ बोर्डाने कोण कोणत्या जागांवर दावा केला आहे.
वक्फ म्हणजे नेमके काय?
वक्फ म्हणजे अल्लाहला समर्पित केलेली मालमत्ता. खरं तर, कोणतीही जंगम किंवा स्थावर मालमत्ता वक्फ असू शकते. जो इस्लामवर विश्वास ठेवतो त्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त घरे असतील. त्यापैकी कोणत्याही एकावर वक्फ करायचा असेल, तर ती व्यक्ती संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर वक्फ करण्याबाबत त्याच्या मृत्युपत्रात लिहू शकते. वक्फ मालमत्तेचा वापर करणारी संस्था यापुढे वक्फ मालमत्तेचा मालक मानली जाते.
देशभरात बांधण्यात आलेली दफनभूमी ही वक्फ जमिनीचा (Waqf Board) भाग आहे. देशातील सर्व दफनभूमीची देखभाल वक्फकडून केली जाते. सध्या देशात 30 वक्फ बोर्ड आहेत. हे वक्फ बोर्ड वक्फ कायदा 1995 अंतर्गत काम करतात. जंगम मालमत्तेच्या बाबतीत तामिळनाडू बोर्ड ऑफ मुस्लिम वक्फ आघाडीवर आहे. त्यांच्याकडे आठ हजार 605 जंगम मालमत्ता आहे. मिझोराम, नागालँड आणि सिक्कीममध्ये कोणत्याही प्रकारची वक्फ मालमत्ता नाही.
1500 वर्ष जुन्या गावावर वक्फचा दावा –
वक्फ बोर्ड अनेक हिंदू मंदिराच्या किंवा ऐतिहासिक जागांवर देखील दावा करत आहे. यापैकी गाजलेले प्रकरण म्हणजे तमिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथील तिरुचेंथुराई गाव. हे प्रकरण 2022 मध्ये खूप चर्चेत आले. किरेन रिजिजू म्हणाले की, हिंदू लोकसंख्या असलेले हे संपूर्ण गाव वक्फ बोर्डाने वक्फ मालमत्ता म्हणून घोषित केले आहे. परंतु हे गाव 1500 वर्षे जुने आहे. जेव्हा या गावातील लोकांना समजले की वक्फ आपल्या जागेवर कब्जा करू पाहत आहे., त्यावेळी त्यांनी आपल्या मालकी हक्काची जमीन असलेले हजारो वर्षे जुनी वडिलोपार्जित मालमत्तेचे कागदपत्र सादर केले. या उलट वक्फ बोर्डाकडे एकही कागदी पुरावा सापडला नाही.
1500 वर्ष जुने असलेल्या मानेंदियावल्ली समेथा चंद्रशेखर स्वामी मंदिरावर दावा केल्यावर तर वक्फचा खोटेपणा उघड झाला होता. कारण मंदिरातील शिलालेखानेच वक्फ बोर्डाचे खोटेपण समोर आणले. यामध्ये ही जमीन मंदिराच्या मालकीची असल्याचे मंदिराच्या शिलालेखावर आढळले. मग वक्फ या जागेवर कशा प्रकारे दावा करत आहे? हे कोडेच ठरले.
एवढेच नव्हे तर 2018 मध्ये वक्फ सुन्नी बोर्डाने ताजमहलवर देखील दावा केला होता. यासाठी सुप्रीम कोर्टाने शहाजहानचे पत्र मागवले होते.
न्यायालयाने सुनावले होते खडे बोल – (Waqf Board)
मध्य प्रदेशातील शाह शुजाचे थडगे, नादिर शहाचे थडगे आणि बिबी साहीब मशीद बऱ्हाणपूरला असलेला राजवाडा यावर वक्फ बोर्डाने दावा केल्यावर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने हा दावा रद्द ठरवत वक्फ बोर्डाला सुनावले. तुम्ही उद्या संपूर्ण भारतावर दावा ठोकाल तर असे होणार नाही. ही मालमत्ता पुरातत्व खात्याची आहे. 1904च्या प्राचीन वास्तू सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत 1913 व 1925ला या वास्तू प्राचीन असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. ही संपत्ती या सुरक्षा कायद्यातून स्वतंत्र करण्यात आल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.
Maharashtra : नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच ऐवजी पाच वर्ष; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
वक्फची जंगम मालमत्ता
देशातील वक्फ मालमत्ता आणि त्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी तयार केलेल्या संकेतस्थळावर त्याचा तपशील नोंदवला जातो. वक्फच्या इस्टेट, स्थावर आणि जंगम मालमत्तांचा तपशील या वेबसाइटवर देण्यात आला आहे. त्यानुसार देशात तीन लाख 56 हजार 47 वक्फ वसाहती आहेत. स्थावर वक्फ मालमत्तांची संख्या आठ लाख 72 हजार 324 आहे. तसेच जंगम मालमत्तांची संख्या 16 हजार 713 आहे. या संकेतस्थळानुसार आतापर्यंत वक्फच्या 3 लाख 29 हजार 995 मालमत्ता डिजिटल करण्यात आल्या आहेत उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल बोर्ड ऑफ वक्फकडे देशात सर्वाधिक वक्फ इस्टेट्स आहेत. त्यांची संख्या एक लाख 24 हजार 735 आहे. सर्वात कमी वक्फ इस्टेटबद्दल बोलायचे झाले तर ती चंदीगड वक्फ बोर्डाकडे केवळ 33 वक्फ इस्टेट आहेत.
वक्फची स्थावर मालमत्ता किती?
देशात सध्या असलेल्या वक्फच्या स्थावर मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर (Waqf Board) या बाबतीतही उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल बोर्ड ऑफ वक्फ पुढे आहे. त्यांच्याकडे दोन लाख 17 हजार 161 स्थावर मालमत्ता आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल बोर्ड ऑफ वक्फकडे 80 हजार 480 वक्फ मालमत्ता आहेत. दादर नगर हवेलीमध्ये सर्वात कमी स्थावर मालमत्ता आहे. ज्यांच्याकडे केवळ 34 स्थावर मालमत्ता आहेत, त्यापैकी केवळ 3 लाख 39 हजार 505 मालमत्तांवर अतिक्रमण झालेले नाही. यासह 13 हजार 202 मालमत्ता न्यायालयीन कचाट्यात अडकल्या आहेत. यामध्ये अंतर्गत आणि बाह्य बाबींचा समावेश आहे. तर 58 हजार 896 मालमत्ता या अतिक्रमणाला बळी पडलेल्या आहेत. याशिवाय 4 लाख 36 हजार 169 मालमत्तांची माहिती मंडळांकडे नाही तर 24 हजार 550 मालमत्ता इतरांच्या श्रेणीतील आहेत.