पुणे : वाबळेवाडी शाळेची सुरूवातही ही प्रत्येक शाळेसारखी (Ware Guruji) होतो. सुरूवातीला फक्त दोन शिक्षक, वारे सर आणि खैरे सर आणि 35 विद्यार्थी या शाळेत शिकत होते. आपल्या शाळेतील शिक्षकांचे विचार आणि तळमळ समजून घेऊन वाबळेवाडी ग्रामस्थ एकत्र आले. गावातील जत्रेतील तमाशा बंद केला, जो आजही बंदच आहे. या ऐवजी ही रक्कम शाळेसाठी दिली.
एका दानशूर व्यक्तीने आपली करोडो रूपयांची जमीन शाळेस बक्षीसपत्र करून दिली. गावकऱ्यांनी पाठपुरावा करून करोडो रूपयांचा निधी मिळवला. भारतात कोठेही नाही अशी आगळीवेगळी काचेची शाळा उभी राहिली. या शाळेची संरक्षण भिंतही काचेचीच आहे.
दरवर्षी लाखो रूपयांचा लोकसहभाग ही शाळा उभी करते. नवनवीन संकल्पना आपल्या (Ware Guruji) शाळेत राबवते. ३५ पटांची शाळा सुमारे 500 पटाच्या पुढे गेली. सरकारने पट वाढल्यावर आदर्श शिक्षक निवडण्याची पद्धती अवलंबून या याळेस आदर्श शिक्षक दिले. या आदर्श शिक्षकांनी पुढे असंख्य विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक केले.
आज महाराष्ट्रभरातील नव्हे, तर देशभरातील असंख्य गाव, शिक्षक यांनी प्रेरणा घेऊन आपल्याही गावात अशी शाळा उभी करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला. सुमारे 30 लाख रूपयांचे आर्टीफिशियल मैदान असलेली ही एक अद्भुत शाळा आहे.
पुस्तकी ज्ञानाशिवाय आंतरराष्ट्रीय शिक्षक, जापनीज भाषा, कला, क्रीडामध्ये या शाळेने यशस्वी प्रयत्न केला (Ware Guruji) आहे. जेव्हा या शाळेतील शिक्षक दत्तात्रय वारे सरांवर अन्याय झाला तेव्हा या वाडीतील प्रत्येक व्यक्ती हळहळला. आपल्या आवडत्या शिक्षकासाठी यांनी शाळा बंद ठेवली. मोर्चे काढले, दिल्ली पर्यंत अन्यायाविरूद्ध पाठपुरावा केला, दिल्लीलाही गेले. वारे सरांची बदली केली होती. ते त्या शाळेत नव्हते तरीही या संघर्षपूर्ण काळात हे गावकरी वारे सरांवरील अन्याय दूर व्हावा म्हणून जीवाचे रान करत होते.
Maharashtra Rain : महाराष्ट्रात धुवांधार पाऊस; मुंबई, कोकणसह विदर्भाला रेड अलर्ट
या तीन-चार वर्षात वारे सर जेथे जायचे तेथे या गावकऱ्यांपैकी कोणी ना कोणी वारे सरांसोबत सतत असायचे. अजूनही हे गावकरी वारे सरांवरील अन्याय कोणी केला, का केला हे जगापुढे आणण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करत आहेत. गावकऱ्यांच्या शाळेवरील प्रेम आणि शाळेबद्दलच्या आपल्या कर्तृव्याच्या जाणीवेतून ही शाळा अजूनही पुढे भरारी घेत आहे. वारे सरांचे मार्गदर्शन अजूनही या शाळेस होत आहे.
आज या शाळेचे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात चमकत आहेत. हे या गावकऱ्यांनी एवढी वर्षे केलेल्या शिक्षण यज्ञाची फलश्रुतीच आहे. या गावकऱ्यांनी लावलेल्या वृक्षाचा आज वटवृक्ष झाला आहे. या वृक्षाची फळे आता चाखायला मिळू लागली आहेत. प्रत्येक शाळा ही अशीच आदर्श होऊ शकते. प्रत्येक गाव याच मार्गाने जाऊ शकतो. आपली भविष्यातील पिढी अजून आदर्श घडवू शकतो. फक्त गरज आहे ती सर्वांनी एकत्र येऊन शाळेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याची!
-.युवराज मालन लक्ष्मण घोगरे (लेखक हे पुण्यातील उपक्रमशील शिक्षक आहेत.)